Kirit Somaiya Viral Video : भाजपने किरीट सोमय्यांचा बळी दिला; Watch Video - सुषमा अंधारे किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कथित आक्षेपार्ह व्हिडिओ (Sushma Andhare on Kirit Somaiya Viral Video) समोर आल्यानंतर आता यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याची राज्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपला एक बळी द्यायचा होता. भाजपने किरीट सोमय्या यांचा बळी दिला आहे. झालेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. काही महिलांचे शोषण केले आहे. याबाबतची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली आहे. पुढे त्या म्हणाल्या, नीलम गोऱ्हे यांनी संवेदनशीलता सोडू नये. सगळ्याचा गोष्टीला बगल द्यायची असेल तर बळी द्यावा लागेल, म्हणून किरीट नावाचा बळी भाजपने दिला आहे.