Gulabrao Patil criticized सुषमा अंधारे हे उद्धव ठाकरे गटात आलेले 3 महिन्याचे बाळ; गुलाबराव पाटलांची टीका - Uddhav Thackeray group
🎬 Watch Now: Feature Video
सुषमा अंधारे Sushma Andhare बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्यासह हिंदू धर्माबाबत व देवीदेवतांबाबत काय बोलले याचेही क्लिप दाखवा अन्यथा आम्ही सहन करणार नाही, असे मंत्री गुलाबराव पाटील Minister Gulabrao Patil म्हणाले. सुषमा अंधारे हे उद्धव ठाकरे गटात आलेले 3 महिन्याचे बाळ आहे, या गटात त्यांचा 3 महीन्यांचाच कार्यकाळ आहे अशी टीका गुलाबराव पाटलांनी माध्यमांशी बोलताना केली. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे Uddhav Thackeray व आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्या बाबत सुषमा अंधारे यापूर्वी काय बोलायच्या याच्या क्लिपही एकदा पहाव्यात. हिंदू देवतांवर या बाईने किती भयानक टीका केलेली आहे. सुषमा अंधारे यांनी टीका जरूर करावी त्यांच्या पक्षाने तो त्यांना दिलेला अधिकार असेल. मात्र बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्मावर व देवी देवतांबाबत काय वक्तव्य केले तेही दाखवा अन्यथा आम्ही सहन करणार नाही. सुषमा अंधारे यांची उद्या गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात महाप्रबोधन सभा आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांना उत्तर देताना गुलाबराव पाटलांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली Gulabrao Patil strongly criticized Sushma Andhare आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST