Supriya Sule On Ajit Pawar : वयाच्या ८३ व्या वर्षी व्यक्तीला घराबाहेर काढण्याची ही कुठली मराठी संस्कृती सुप्रिया सुळेंचा सवाल
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 7, 2023, 9:08 PM IST
बारामती (पुणे) : Supriya Sule On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार (NCP Ajit Pawar Group) गटातील अनेक नेते शरद पवार हे आमचे दैवत विठ्ठल आहेत, असे म्हणत होते. महाराष्ट्रातील आणि भारताच्या संस्कृतीतील ही पहिलीच गोष्ट असेल की ज्यांना दैवत म्हणायचे त्यांनाच आपल्या घरातून वयाच्या ८३ व्या वर्षी बाहेर काढण्याची (Ajit Pawar) ही कुठली मराठी संस्कृती आहे, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Sharad Pawar)
'कुछ तो गोलमाल है' : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील सर्व वरिष्ठ असे सांगतात की, चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळणार आहे. या प्रकरणाचा पेपर आधीच फुटलेला आहे. परीक्षेच्या आधीच त्यांना माहिती आहे की, त्यांना किती मार्क पडणार आहेत. पक्ष आणि चिन्ह त्यांना मिळणार असल्याचे अगोदरच कसे कळते? याचा अर्थ दिल्लीची कोणती तरी अदृश्य शक्ती ती त्यांना सांगत आहे. दिल्लीतील ही अदृश्य शक्ती कोण आहे? पेपर कसा फुटला? 'कुछ तो गोलमाल है', असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.