Mungantiwar Reaction : नितीन देसाई यांचे जाणे मनाला चटका लावून जाणारी घटना - सुधीर मुनगंटीवार - Mungantiwar Reaction
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज सकाळी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र तसेच देशासाठी ही अत्यंत दुःखद बाब असून त्यांच्या आत्महत्येमागे आर्थिक अडचण हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. तर आत्महत्येबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलताना म्हणाले की, फारच दुःखद व मनाला चटका लावून जाणारी अशी ही घटना आहे. नितीन देसाई कलेचे बादशाह होते. अनेक अविष्कार त्यांच्या अंगी होते. असा दुर्मीळ कलाकार अशा पद्धतीने जीवन संपवेल हे कोणालाही वाटले नव्हते. याचे कारण तर अजूनही दुःखदायक आहे. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आत्महत्या केली असे सांगितले जात आहे. खरे सांगायचे तर त्यांच्या अंगात जी काही कला होती ती पाहता पैसा त्यांच्या पायापाशी आला असता. परंतु त्यांनी हे पाऊल का उचलले ते अजून अस्पष्ट असून पूर्ण तपासाअंती ते समोर येईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.