Shrinivas Patil On Maratha reservation : मराठा आरक्षणाबाबत खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले... - President Sharad Pawar friend Srinivas Patil
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 24, 2023, 4:44 PM IST
|Updated : Oct 24, 2023, 5:26 PM IST
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली युवकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. रोहित पवार आज सकाळपासून युवा संघर्ष यात्रेत सहभागी आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर युवा संघर्ष यात्रेनं महात्मा फुले वाडा, लाल महालात अभिवादन केलं. यावेळी लाल महाल ते टिळक स्मारक अशी पायी यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तेथे तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील सर्व ज्येष्ठांनी यात सहभाग घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मित्र खा. श्रीनिवास पाटील हेही या यात्रेत सहभागी झाले आहेत. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपलं मत व्यक्त केलंय. जे मिळायला हवं ते मिळत नाही असं श्रीनिवास पाटील यांनी म्हटलं आहे.