Ganesh Festival : अडीच कोटी रुपयांच्या नोटांसह नाण्यांची गणेश मंदिरात आरास, पहा व्हिडिओ - श्री सत्यगणपती मंदिर
🎬 Watch Now: Feature Video


Published : Sep 18, 2023, 4:17 PM IST
बंगळुरू Ganesh festival : पुट्टेनहल्ली, जेपी नगर येथील श्री सत्यगणपती मंदिरानं अडीच कोटी रुपयांच्या भारतीय चलनी नोटा तसंच नाण्यांनी सजावट केलीय. यात 500 रुपये, 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 20, 10 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. गणेश चतुर्थीनिमित्त शहरात विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. विशेषत: जेपी शहरातील पुत्तेनहल्ली येथील श्री सत्यगणपती मंदिरात देशात प्रथमच कोट्यवधी रुपयांच्या नोटा, नाण्यांची सजावट करण्यात आलीय. त्यामुळं याकडं सर्वांच लक्ष लागलंय. श्री सत्यगणपती शिर्डी साई ट्रस्टनं भक्तांना नवीन पद्धतीनं पूजा करण्याची संधी देण्यासाठी वेगळी सजावट केली आहे. यावेळी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्यांनी सुमारे 56 लाख रुपयांच्या नोटांचा वापर करून हार बनवून वेगळं रूप दिलंय. त्यामुळं मदिर परिसर नागरिकांच लक्ष वेधून घेतंय.