Uday Samant : महाविकास आघाडीचे काही आमदार आमच्या संपर्कात - उदय सामंत - उद्योग मंत्री उदय सामंत
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : वर्षभरानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. महाराष्ट्रात शिंदे यांचे शिवसेना, भाजपचे युतीचे सरकार असतानाही भाजप शिंदेंच्या खासदारांच्या मतदारसंघांना भेटी देऊन पक्षाचा विस्तार करत असून तेथे भाजप दावा करत आहे. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या जागांवर भाजपचा डोळा नाही. हे निर्विवाद सत्य पण, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही भाजप शिवसेना युती म्हणूनच लढणार, दोघांनाही फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांचा पुतळा काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याविषयी बोलताना उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र सदनात काय झाले. त्याची माहिती घ्यायला हवी, कारण हा संवेदनशील विषय आहे.सगळ्या महापुरुषांचा आम्ही आदर करतो, माहिती न घेता बोलणे योग्य नाही असे सामंत म्हणाले. संसद उद्घाटनावरून विरोधक आणि सरकारमध्ये टीका सुरू आहे. त्याविषयी बोलताना उदय सामंत म्हणाले कार्यक्रमाला अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. संसद पवित्र ठिकाण आहे. त्याचं पवित्र प्रत्येकाने राखलेच पाहिजे. मी काही बोलून वाद वाढवणार नाही. पंतप्रधान मोदी जे करू शकले ते दुसऱ्या कुठल्याच पंतप्रधानाला जमले नाही, हे त्रिकाल बाधित सत्य आहे.