Soldier Diwali : जवानांनी बॉर्डरवर अशाप्रकारे साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडिओ - Diwali Festival
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 12, 2023, 5:59 PM IST
जम्मू Soldier Diwali : सीआरपीएफ जवानांनी शनिवारी जम्मूमध्ये दिवाळी साजरी केली. आपल्या घरापासून आणि कुटुंबांपासून दूर, सैनिकांनी सीमेवर मेणबत्त्या आणि दिवे लावून दिवाळीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला. यावेळी जवानांनी फटाके फोडले आणि देशभक्तीपर गाण्यांवर डान्सही केला. फटाक्यांच्या आतषबाजीनं जवानांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. जवानांच्या उत्साहानं त्या वातावरणात आणखी भर पडली. सीआरपीएफ कॅम्पमधील सैनिकांची दिवाळी देशाप्रती त्यांची बांधिलकी, समर्पण आणि शौर्य दर्शवते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. "हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो अशी कामना आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.