Video ग्रहण हे अत्यंत शुभ असते, महंत अनिकेत शास्त्री देशपांडे - Spiritual Significance Importance
🎬 Watch Now: Feature Video
25 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण Surya Grahan 2022 होत आहे. ग्रहण म्हटल्यावर याबाबत अनेक समज गौरसमज आहेत. त्यात यंदाचे सूर्यग्रहण हे एन दिवाळीच्या पर्वत आले आहे. त्यामुळे दिवाळी संबंधी अनेक प्रश्न मनात निर्माण झाले आहे. मात्र हे ग्रहण हे अत्यंत शुभ असते असे महंत अनिकेत देशपांडे यांनी सांगितले आहे. महंत अनिकेत देशपांडे Mahant Aniket Shastri सांगतात की, या दिवाळीत अमावस्येला एक दुर्लभ योग जुळून आला आहे. तो म्हणजे या वर्षातील शेवटचे असणारे खंडग्रास सूर्यग्रहण,अनेक वर्षानंतर हा योग जुळून आला आहे. हे सूर्यग्रहण भारताबरोबरच,आशिया खंड व आफ्रिका खंडात दिसणार आहे, या ग्रहणाच्या दिवसाच्या अनेक शंका आणि भीती मनात उत्पन्न होत असते, मात्र कोणतीही मनात भीती बाळगण्याचे कारण नाही, साधणासाठी ग्रहणासारखा उत्तम मुहूर्त नाही. या ग्रहण काळामध्ये जर आपण जप- तप, उपासना केली तर त्याचे शंभर पट फळ प्राप्त होते. त्यामुळे या ग्रहण काळात जास्तीत जास्त प्रमाणात इष्ट देवतेची उपासना,जप,नामस्मरण,पूजा, अनुष्ठान,वाचन धार्मिक तथा मनशुद्धी करणारे कर्मसिद्धी करावे.याचा चांगला लाभ होतो, मात्र या काळामध्ये अशुभ विचार मनात ठेवले तर त्यांना मात्र ग्रहण काळाचा त्रास होईल, एकूणच काय तर या ग्रहण काळात जो जे कर्म करेल तसेच त्याला शंभर पटीने फळ मिळेल ते चांगले कर्म असो की वाईट असेही महंत सांगतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST