Kolhapur News : कोल्हापुरात जागतिक 50 खोके दिन साजरा; प्रतिकात्मक पद्धतीने रचले पन्नास खोके - कोल्हापूर शहरातील बिंदू चौकात निदर्शने
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : शिंदे सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूर शहरातील बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. 50 खोके जागतिक वर्धापनदिन यावेळी साजरा करण्यात आला. यावेळी आंदोलन करताना प्रतिकात्मक पद्धतीने पन्नास खोके रचले होते. या खोक्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी हातात खोके घेऊन 50 खोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. आजच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत गद्दारांनी सुरा खूपसला होता, त्यामुळे आजचा दिवस आम्ही 50 खोके जागतिक वर्धापन दिन म्हणून साजरा करत असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. 50 खोके एकदम ओके, गद्दारांना गाडा अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.