Vikhe Patil on Sharad Pawar : शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले - राधाकृष्ण विखे पाटील - शरद पवार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 8, 2023, 3:29 PM IST

अहमदनगर - महाविकास आघाडीची वज्रमुठ ही एकमेकांच्या विरोधात उगारल्या जातील हे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधीच व्यक्त केले होते. आता खर ठरताना दिसून येत असल्याचे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डीत बोलले. संजय राऊत आणि भुजबळ यांच्या आजच्या वक्तव्याने आज सिद्ध झाल्याच विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत 'वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले.' असा आरोप केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मविआतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे वज्रमुठ बांधणारे आता भविष्यात ही वज्रमुठ एकमेकांवर उगारल्या शिवाय राहणार नसल्याच विखे पाटील यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी नेहमीप्रमाणे शब्द फिरवल्याने विश्वसहर्ता गमावली आहे. सर्व बड्या नेत्यांची स्वतःच अस्तित्व टीकवण्यासाठी धडपड चालली आहे. असेही विखे पाटील यावेळी म्हणाले आहे. महाष्ट्रातील मुंबई नंतर दुस-या क्रमांचे म्हणून शिर्डी विमानतळ विकसीत होणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. शिर्डी विमानतळावर नवीन प्रवाशी टर्मीनल दुमजली इमारत उभारणी केली जाणार असून यासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्य शासनाने करत निविदा प्रक्रीया पार पडल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तब्बल तीस कंपन्यांनी टेंडर भरले असून ज्या कंपन्या लहानसहान काम करत नाही, त्यांनी सुद्धा साईबाबांवरील श्रद्धेपोटी काम करण्याची तयारी दर्शवली आहे. एकाच वेळी 12 विमाने उभी राहण्याची नव्याने व्यवस्था शिर्डी विमानतळावर असल्याने भविष्यात मुंबईनंतर शिर्डी विमानतळाचा क्रमांक लागणार असल्याच विखे पाटील यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.