NCP Workers on Sharad Pawar Resign : शरद पवारांच्या निवृत्तीला कार्यकर्त्यांचा विरोध; म्हणाले... - यशवंतराव चव्हाण सेंटर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दोन मे रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर इथे पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. यावेळी घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे भावूक झाले. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा असे मत सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर पक्षाचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी यांच्याकडून पवार यांची मनधरणी सुरू आहे. तर पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रतिक्रिया देत मते व्यक्त करत आहेत. तर पुण्यातील एका कार्यकर्त्याने तर चक्क स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून साहेब आपण निर्णय बदलावा असे म्हटले आहे.