विचलित होऊ नका, संधीसाधूंना संधी देऊ नका - शरद पवारांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र - पुण्यात शरद पवार बरसले
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 2, 2023, 4:46 PM IST
|Updated : Dec 2, 2023, 5:23 PM IST
पुणे Sharad Pawar On Ajit Pawar : शुक्रवारी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar) शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबतीत अनेक गौप्यस्फोट करण्यात आले होते. यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांच्या मेळाव्यात पवारांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, काही लोकांना आपल्यावर टीका टिप्पणी केली. ज्यांनी पक्ष सोडला ते पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आज त्यांच्याकडून आपल्यावर टीका होत आहे. त्याचा फारसा विचार करू नका कारण त्यांच्या ध्यानात येत आहे की, उद्या लोकांकडे आपण गेलो तर लोक आपल्याला प्रश्न विचारतील. म्हणून त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी ते टीका करत आहेत. त्यामुळं संधी साधूना संधी देऊ नका. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील राज्यातील निवडक मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत पवार बोलत होते.