Sharad Pawar News राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ज्ञानेश्वर माऊली चरणी लीन; प्रदूषण मुक्त इंद्रायणीसाठी दिलं 'हे' आश्वासन - इंद्रायणी नदी प्रदूषित
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 1, 2023, 2:03 PM IST
पुणे Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज तीर्थक्षेत्र आळंदी इथं संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला. 2019 नंतर आज पुन्हा शरद पवारांनी ज्ञानेश्वर माऊली यांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला आहे. आज आळंदी नगरीमध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्याचबरोबर देहू आणि आळंदी इथून वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषित असल्याचं पुन्हा एकदा आळंदी येथील ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी शरद पवार यांच्या लक्षात आणून दिलं. शरद पवार यांनी या संदर्भात संबंधित नेत्यांशी चर्चा करुन यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. पवित्र इंद्रायणी नदी ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषित होत असल्याचं चित्र उघड झालं आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्चदेखील केला जात आहे. मात्र पवित्र इंद्रायणी अजूनही प्रदूषित आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिरात शरद पवारांनी दर्शन घेतल्यानंतर भागवत वारकरी महासंघ यांच्यातर्फे आयोजित एकदिवसीय भागवत वारकरी संमेलनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या संमेलनात संतांच्या वारकरी संप्रदायातील सर्व प्रवचन, कीर्तनकार, प्रबोधनकार, लेखक, वादक, गायक आदी सर्व वारकऱ्यांना निमंत्रित केलं आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप दिनकर भुकेले महाराज यांची उपस्थिती होती.