Mushrif On Pawar : पहिल्यांदाच माझ्या अनुपस्थितीत पवारांची कोल्हापुरात सभा; हसन मुश्रीफ झाले भावूक - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 25, 2023, 5:30 PM IST
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो कोल्हापुरात बोलताना म्हणाले की, देवाच्या कृपेनं शरद पवारांचं वक्तव्य खरं ठरत आहे. शरद पवार यांची 40 वर्षात प्रथमच माझ्या अनुपस्थितीत कोल्हापुरात सभा होत आहे. बीडनंतर शरद पवारांची कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजूनही एकसंध असल्याचे सांगण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला. मात्र पक्षातील काही नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांना वेगळी भूमिका घेण्याचा अधिकार होता, असं वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असल्याचं वक्तव्य केल्याने राजकारणात खळबळ उडाली होती.