राष्ट्रवादीच्या शिबिराचा आज समारोप, शरद पवारांसह सुप्रिया सुळे साईबाबांच्या चरणी, पाहा व्हिडिओ - राम मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 4, 2024, 11:07 AM IST
|Updated : Jan 4, 2024, 11:17 AM IST
शिर्डी Sharad Pawar in Shirdi : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं शिर्डीत दोन दिवसीय शिबीर होत आहे. या शिबीराचा आज समारोप होत आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे शिर्डीमध्ये दाखल झाल्या आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी शिर्डी इथं साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्याहस्ते साईबाबांची आरतीही करण्यात आली. याप्रसंगी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते. साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कारही करण्यात आला. मागील आठवड्यात राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन विचारलेल्या प्रश्नावर, मी देवा-धर्मापासून जरा दूर असतो, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. यानंतर आज त्यांनी शिर्डीत साई बाबांच दर्शन घेत आरती केलीय. शरद पवार हे नास्तिक असून त्यांचा मंदिरातला फोटो बघितलाय का? असा आरोप राज ठाकरेंनी एप्रिल 2022 मध्ये केला होता. यावर बोलताना शरद पवार यांनी मी माझ्या आस्थेचं प्रदर्शन करत नाही. मी नास्तिक नाही, असंही पवार यांनी म्हटलं होतं.