Sharad Pawar Retirement : शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय अचानक घेतला नाही - विठ्ठलशेठ मणियार - शरद पवार
🎬 Watch Now: Feature Video

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच नेते मंडळी, राज्यभरातील कार्यकर्ते हे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे राज्यातील विविध नेते मंडळी यांच्याकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आत्ता यावर शरद पवार यांचे मित्र विठ्ठवलशेठ मणियार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की साहेबांनी हा अचानक घेतलेला निर्णय नाही, तर पूर्ण विचारपूर्वक होऊन त्यांनी तो निर्णय घेतला आहे. माझी, त्यांची कधीच याविषयावर चर्चा देखील झाली नाही. त्यांनी देखील मला कधीच सांगितल नाही. पण मी त्यांना नेहेमीच म्हणत होतो की कधी तरी तुम्ही हा निर्णय घ्यावा. समजाकरण तसेच आपण उभ्या केलेल्या संस्था संघटनांना अधिक वेळ द्यावा अस मी त्यांना अनेक वेळा म्हटल असल्याचे मणियार यांनी म्हटले आहे.