Seena Kolegaon dam overflow सीना कोळेगाव धरण ओव्हर फ्लो, १० हजार १४० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 27, 2022, 6:03 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

उस्मानाबाद  24 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता सीना कोळेगाव धरण तुडुंब भरले Seena Kolegaon dam overflow Osmanabad. सीना कोळेगाव धरण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण आहे. धरण ओवरफ्लो झाल्यामुळे 26 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता धरणातून १०१४० क्युसेस पाण्याचा विसर्ग Sina Kolegaon Dam Water Discharge सुरू करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाच्या वतीने सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Sina River Village Alert देण्यात आला आहे. सलग तिसऱ्यांदा सीना कोळेगाव धरण 100 टक्के क्षमतेने भरले आहे. सन 2007 मध्ये जिल्ह्यातील सर्वांत मोठा प्रकल्प म्हणून 5.30 टीएमसी क्षमतेचा सीना कोळेगाव प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रकल्प शेती सिंचनासाठी जीवनदायीनी ठरत आहे. सध्या सीना कोळेगाव प्रकल्प अंतर्गत परंडा तालुक्यातील 6800 हेक्टर व करमाळा तालुक्यातील 3400 हेक्टर असे एकूण दहा हजार दोनशे हेक्टर जमीन क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. सीना कोळेगाव प्रकल्पाची 150.49 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता आहे. सलग तिसऱ्या वर्षी सीना कोळगाव प्रकल्प तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. तर सिना कोळेगाव प्रकल्पातून अनाळा उपसा सिंचन योजनेतून Anala Lake Irrigation Scheme अनाळा तलावात पाणी सोडण्याची मागणी अनाळा ग्रामस्थ करीत आहेत. Seena Kolegaon dam Osmanabad
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.