अब्दुल सत्तार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ! माझ्याबाबत षडयंत्र रचले सत्तारांची प्रतिक्रिया - Abdul Sattar
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. परंतु, मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी काल माजी मंत्री व बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींवर टीईटी घोटाळ्यामध्ये बोगस प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यावरून अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल की नाही यावर चर्चा रंगू लागल्या असताना आज त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बोलताना टीईटी घोट्याला प्रकरणी हे सर्व षडयंत्र असून, माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याशी खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST