Saptshringi Mata temple Nashik : सप्तशृंगी मातेच्या मंदिराचे पालटणार रूप, 'या' तारखेपासून कामास होणार शुभारंभ; पाहा व्हिडिओ - सप्तशृंगी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 28, 2023, 5:17 PM IST

नाशिक :  महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ असलेल्या वणी येथील सप्तशृंगी मातेच्या मंदिराचे रूप पालटणार आहे. सप्तश्रृंगी मंदिर भाविकांच्या योगदानातून साडे आठ कोटी रुपये खर्च करून भव्य साकारण्यात येणार आहे. 22 एप्रिलला या कामाचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सप्तश्रृंगी मातेचे वैशिष्ट्य : नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले सप्तशृंगी मातेचं मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. वणी सप्तशृंगी आदिशक्तीचे  स्वरुप देखील आहे. सप्तश्रृंगी देवी नवनाथांची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची कुलस्वामीनी आहे. मार्कंड्ये ऋषींनी नाशिकमधील सप्तशृंगी गडावर तपश्चर्या केली. प्रभू श्रीरामचंद्र सप्तश्रृंगी गडावर येऊन गेल्याचे उल्लेख पौराणिक संदर्भांमध्ये  आढळतात. संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी सप्तशृंगी आदिशक्तीची परवानगी घेऊन ते त्र्यंबकेश्वरी समाधीस्त झाले, असा इतिहासात उल्लेख सापडतो.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.