Sanjay Raut on bail : संजय राऊत यांची कारागृहातून सुटका, आर्थर रोड परिसरात समर्थकांची गर्दी - Arthur Road Jail in mumbai
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : तब्बल 100 दिवसांपासून न्यायलयीन कोठडीत असलेले उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on bail ) यांना आज सत्र न्यायलयाने जामीन मंजुर केला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून साधारणतः 7 वाजेच्या आत त्यांची सुटका करण्यात आली आहे. आर्थर रोड कारागृहातून ( Arthur Road Jail ) त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने कारागृह परिसरात उपस्थित असून मोठ्या आतुरतेने त्यांच्या सुटकेची पाहत होते. आज आमचा वाघ बाहेर आला असून, न्यायदेवतेने योग्य न्याय दिल्याचे त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच आमचा वाघ अखेरपर्यंत झुकला नाही, आणि आज सत्याचा विजय झाला असल्याचे महिला समर्थकांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST