Sri Siddhivinayak Nashik : उन्हाचा त्रास होवू नये म्हणून नाशिकमध्ये गणरायाला 'इतक्या' किलोंची चंदनाची उटी आणि मोगऱ्याची आरास - चंदनाची उटी
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : संपूर्ण राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. मे महिना सुरू आहे. त्यामुळे उन्हाचा त्रास होवू नये, म्हणून नाशिकमध्ये गणरायाला 21 किलो चंदनाची उटी आणि 50 किलो मोगऱ्याची आरास करण्यात आली. महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा लाडक्या बाप्पाला अर्थात श्री सिद्धिविनायकाला त्रास होऊ नये, यासाठी नाशिकच्या रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाला चंदनाची उटी लावण्यात आली. 21 किलो चंदनाच्या पावडरची उटी लावण्यात आली. तसेच 51 किलो मोगरा आणि गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट करण्यात आली. या आरासमुळे मंदिर परिसरामध्ये शितलता निर्माण झाली आहे. बाप्पाचे हे मोहक रूप बघण्यासाठी गणेश भक्त मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दी करत आहे. गणरायाचे हे चंदनाच्या उटीतील रूप अतिशय मोहक आहे. मंदिरामध्ये अतिशय प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. सगळीकडे चंदन आणि मोगऱ्याचा सुगंध दरवळत आहे. अशा प्रसन्न वातावरणात भाविक लाडक्या बाप्पाचे दर्शन घेत आहेत.