Samruddhi Mahamarg Accident : महामार्गावरील आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करा; अपघातानंतर दानवेंची मागणी, पहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 11:54 AM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Samruddhi Mahamarg Accident : सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टॅम्पो ट्रॅव्हलरला आज पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आले आहेत. हा अपघात वैजापूर जवळील समृध्दी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्यावर झालाय. उभ्या ट्रकला ट्रव्हलर बस धडकल्यानं हा अपघात झालाय. या अपघातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या अपघातावरुन आता राजकारण सुरु झालंय. या टॅम्पो ट्रॅव्हलरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कसे काय प्रवासात करत होते? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. तसंच महामार्गावर असलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही दानवेंनी केलीय.   

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.