Sambhaji Brigade : बाबासाहेब पुरंदरेंचा तो पुतळा लवकरात लवकर हटवा, नाहीतर...; संभाजी ब्रिगेडचा प्रशासनाला इशारा - संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 27, 2023, 12:49 PM IST
पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पुतळा लावण्यात आलायं. यावरून आता संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाली. 'शिवाजी महाराज यांच्या शेजारी लावण्यात आलेला बाबासाहेब पुरंदरेंचा पुतळा लवकरात लवकर काढण्यात यावा. संभाजी ब्रिगेड हे कधीही खपवून घेणार नाही', असा सज्जड इशारा ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी प्रशासनाला दिलाय. 'महापालिका प्रशासनानं या प्रकरणी तातडीने कारवाई केली नाही, तर आगामी काळात त्यांची गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे', असा गर्भित इशाराही संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदेंनी दिला. शिल्प बनवणाऱ्या व्यक्तीवर महानगरपालिकेनं गुन्हा दाखल करावा. तसेच बालगंधर्व व्यवस्थापकावर महानगरपालिकेने परवानगी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा', अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे, असे ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी सांगितलं.