Salman Khans Fan : सलमानच्या फॅनचा हैद्राबाद ते मुंबई पायी प्रवास - journey from Hyderabad to Mumbai
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 16, 2023, 3:21 PM IST
पुणे : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा जगभरात ज्या प्रकारचा चाहता वर्ग आहे तो खरोखरच अतुलनीय आहे. दबंग स्टार सलमान खानच्या बहुचर्चित 'टायगर ३' या चित्रपटाला यश मिळावं यासाठी सलमानचा जबरा फॅन हैद्राबाद वरून चालत थेट मायानगरी मुंबईला निघालाय. टी नवीन असं या तेलगू भाषिक सलमानच्या फॅनच नाव आहे. हैद्राबाद ते मुंबई हे ६६४ किलो मीटरच अंतर तो पायी चालतोय. आज त्याच्या या पैदल यात्रेचा ९ वा दिवस असून आज तो पिंपरी चिंचवड शहरात दाखल झालाय. अजून त्याचा १४२ किमी चा प्रवास बाकी असल्याचं त्यानं म्हटलंय. हैद्राबाद येथील गणपतगट गाव येथून त्यानं या यात्रेला सुरुवात केलीय. अंगावर एकजोडी कपडा खिशात ५०० रुपये आणि अंथरायला चादर घेऊन तो हैद्राबादमधील गणेश गड्डा मंदिर येथून दर्शन करत तो मुंबईच्या दिशेनं रवाना झालाय. उद्या तो मुंबईत दाखल होणार असून मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात सलमानच्या 'टायगर ३' या चित्रपटाला यश मिळावं यासाठी साकडं घालणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुढं तो सलमान देखील भेटणार असल्याचं त्यानं म्हंटलय.