Rohit Pawar : शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबियांची रोहित पवार यांनी घेतली भेटली - Rohit Pawar Visit In Buldhana
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 12, 2023, 8:11 PM IST
पुणे Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी आज शहीद झालेला अग्निवीर अक्षय गवते (Akshay Gawate) यांच्या कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली. राज्य सरकारनं अनेकदा मदतीचा आकडा जाहीर केलेला आहे. परंतु त्यांच्या कुटुंबियांना आणखी कुठली मदत मिळाली नाही. त्यामुळे नेमकी मदत कशी मिळाली नाही याची विचारपूस रोहित पवार यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून केली आहे. तसेच या कुटुंबाला मदत लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. केंद्र व राज्य सरकारनं मदतीची घोषणा केली पण अजूनही मदत पोहचली नसल्याची खंत, परिवारातील सदस्यांनी व्यक्त केली. दगडा-मातीच्या व पत्र्याच्या घरातून देशासेवेची प्रेरणा घेतलेले गवते आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या परिवारानं एक घरकूल मिळावं ही इच्छा व्यक्त केली. रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी आणि सैन्य दलातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून गवते कुटुंबियांना लवकर मदत मिळावी याबाबत चर्चा केली.