Reda worth one and haff Crores : दीड कोटींचा रेडा ठरतोय सातारकरांचं आकर्षण, खासदार उदयनराजेंनी केलं फोटोसेशन; पाहा व्हिडिओ - Reda worth one and haff Crores
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 20, 2023, 9:08 AM IST
सातारा Reda Worth one and haff Crores : सातार्यातील जिल्हा परिषद मैदानावर खासदार उदयनराजे भोसले मित्र समुहाने छत्रपती कृषी, औद्योगिक प्रदर्शन आयोजित केलं आहे. या प्रदर्शनात कर्नाटकातील विलास नाईक यांचा दीड कोटी रुपये किंमतीचा 'गजेंद्र' रेडा सातारकरांच आकर्षण ठरलाय. तब्बल २० पुरस्कार मिळविणारा हा रेडा पंजाबमधून आणलेल्या म्हशीपासून जन्माला आलाय. हा रेडा महाराष्ट्र, कर्नाटकात हिंदकेसरी पुरस्काराचादेखील मानकरी ठरला आहे. दररोज १५ लिटर दूध, ४ किलो पेंड, ३ किलो गव्हाचा आटा आणि ३ किलो सफरचंद, असा त्याचा खुराक आहे. हा रेडा पाहिल्यानंतर खासदार उदयनराजे भोसलेदेखील चकित झाले. तसेच प्रदर्शनात त्यांनी फोटोसेशन देखील केलं. दरम्यान, दीड कोटीचा हा रेडा बघण्यासाठी कृषी प्रदर्शनात लोकांची गर्दी होत आहे.