खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया - Arjun Khotkar Reaction

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 8:46 PM IST

जालना Arjun Khotkar Reaction : आज राज्यासह देशात मोठी राजकीय घडामोड घडली आहे आणि या घडामोडीकडे दिवसभरापासूनच राज्यातील सर्व नागरिकांचं लक्ष लागून राहिलं होतं. (MLA disqualification issue) ती घडामोड म्हणजे शिवसेना हा पक्ष नेमका कुणाचा? आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला असून खरी शिवसेना ही शिंदेंची असल्याचं स्पष्ट केलं आहे. (Shinde group Shiv Sena) त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (Rahul Narvekar) त्याच पार्श्वभूमीवर आज जालना येथील माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्याशी पत्रकारांनी बातचीत केली. यावेळी बोलताना खोतकर म्हणाले की, निश्चितच मी शिंदे गटाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळं मला शिंदे गट यांच्या बाजूनं निकाल लागल्याचा खरोखरच आनंद झाला आहे. शेवटी सत्याचा विजय झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.