Manipur Violence : मणिपूरमधील सद्य परिस्थितीवर काय म्हणाले स्थानिक विद्यार्थी, जाणून घ्या - Manipur
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : मणिपूरमध्ये गेल्या 70 दिवसांपासून संघर्ष पेटलेला आहे. अद्यापही तेथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आल्यानंतर राज्यात हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचारात आत्तापर्यंत 160 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. 19 तारखेला दोन महिलांच्या नग्न धिंडीचा व्हिडिओ समोर आला होता, ज्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. तसेच आरोपींना कडक शिक्षा व्हावी ही मागणी देखील केली जात आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने पुणे शहरात शिक्षण घेणाऱ्या मणिपूरच्या विद्यार्थ्यांशी बातचित केली. या विद्यार्थ्यांनी झालेल्या घटनेबाबत चिंता व्यक्त करत दोन्ही समाजाने आपापसातील भांडणे मिटवून एकोप्याने राहावं, असे आवाहन केले आहे. पहा काय म्हणाले हे विद्यार्थी..