D. k. Shivkumar: काँग्रेसच्या अभूतपुर्व यशानंतर आभार मानताना डी.के.शिवकुमार यांना अश्रू अनावर - कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला अभूतपुर्व यश
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरु (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभेत मिळालेल्या अभूतपुर्व यश मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले. या विजयाचे श्रेय मी माझे कार्यकर्ते व पक्षाच्या नेत्यांना देतो. त्यांच्याच कष्टामुळे हा विजय मिळाला अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली. तसेच, यावेळी त्यांनी काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे आभार मानले. त्याचेवळी त्यांना रडू कोसळले. त्यांनी यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आपल्याला भेटण्यासाठी तुरुंगात आल्याची आठवण करत तो क्षण मी कधीच विसरणार नाही अस ते म्हणाले. यावेळी त्यांना रडू आले होते. गेल्या महिन्यापासून सर्वच आम्ही काम करत आहोत त्याचे हे यश आहे असही ते म्हणाले आहेत.