Video महिलेला आधी झाडाला बांधले, नंतर जोरजोराने मारले.. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Woman tied to tree and beaten in Ratlam
🎬 Watch Now: Feature Video
रतलाम (मध्यप्रदेश): जिल्ह्यातील अलोट येथे महिलेला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. ही क्रूरता इतर कोणी नसून महिलेचा पती आणि कुटुंबीयांनी केली आहे. तर, तारागड गावात राहणारी महिला तिच्या प्रियकरासह पळून गेली होती आणि त्याच्यासोबत राजस्थानमध्ये राहत होती. पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेला तारागडच्या घरात येण्यास नकार दिला, तरीही महिलेला तिच्या पतीच्या घरी राहायचे होते, यावरून वाद झाला. महिलेने प्रियकराला सोडले आणि पतीच्या घरात राहू लागली. त्यानंतर पती थनुलालसह त्याचा भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्य मुकेश नायक, मोहन, नारायण, कमल, विक्रम आदींनी महिलेला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 326, 342, 506, 34,294 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. Ratlam Woman Assault, Woman tied to tree and beaten in Ratlam, Ratlam Woman Assault video
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST