Athawale appeals Uddhav Thackeray: उद्धवजींनी माझं ऐकलं असतं तर... ; काय म्हणाले रामदास आठवले?

By

Published : May 4, 2023, 6:42 PM IST

thumbnail

ठाणे: उद्धव ठाकरे यांनी एकटे न राहता भारतीय जनता पक्षासोबत यावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळेच अडीच वर्षांनी त्यांच्यासोबत धोका झाला व ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. धनुष्यबाण गेले आणि शिवसेना हे नावंही गेले. आता इकडे-तिकडे न जाता उद्धव ठाकरेंनी भाजप सोबत यावे, असे आठवले म्हणाले. 
 

'हे' काम एवढं सोपं नाही: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ठाण्यातील मानपाडा परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहभागी झालेल्या रामदास आठवले यांनी आपल्या मिश्किल स्वभावात कविता ऐकवत विरोधकांना चिमटे काढले. बरेच लोक एकनाथ शिंदे यांचे सरकार पाडा असे म्हणत आहेत; परंतु हे काम एवढं सोपं नसल्याचे ते म्हणाले. बाळासाहेबांनी 'शिवशक्ती-भीमशक्ती'चा नारा दिला होता; मात्र उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत गेल्याने त्याच्या पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्ष देशातील २५ राज्यांमध्ये असून २७ मे रोजी पक्षाचे दिल्लीत आणि महाराष्ट्रात अधिवेशन होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी यावे असे आवाहन आठवलेंनी केले. 

हेही वाचा:  Uddhav Thackeray News : मोदींचा नाही तर 'मोदी प्रवृत्तीचा पराभव' करायचा आहे - उद्धव ठाकरे

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.