Ramayana Cultural Center video: रामायण कल्चरल सेंटरचा व्हिडीओ रिलीज; उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार लोकार्पण - रामायणा कल्चरल सेंटरचा व्हिडीओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 4, 2023, 7:09 PM IST

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर शहरातील कोराडी येथे भारतीय विद्या भवनकडून निर्माण करण्यात आलेले रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण होणार आहे. (Ramayana Cultural Center video) हे रामायणा सांस्कृतिक केंद्र आतून कसे दिसत असेल याबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रामायणा सांस्कृतिक सेंटरचा एक व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. (Ramayana Cultural Center Koradi) नागपूर येथील कोराडी येथे भारतीय विद्या भवनतर्फे भवनच्या रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. (Ramayana Cultural Center Inauguration) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण होणार आहे. या रामायण सांस्कृतिक केंद्रात चित्र स्वरूपात रामायणाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. तीन एकर जागेवर दक्षिण भारतीय शैलीत हे सेंटर तयात करण्यात आले आहे. ही दुमजली इमारत आहे. ज्याच्या पहिल्या मजल्यावर महाकाव्य रामायणातील प्रसंग विविध चित्रांच्या स्वरूपात मांडलेले आहेत. महर्षी तुलसीदासांच्या रामायणाच्या लेखनापासून ते रामायणाच्या मूळ कथेपर्यंत एकूण 108 चित्रे या दालनात मांडण्यात आली आहेत. चित्रांमधील घटना आणि व्यक्तिमत्त्वे समजून घेण्यासाठी येथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत माहिती देण्यात आली आहे. आतील सजावट ही राजवाड्यासारखीच असून रंगसंगती, ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजना त्याच पद्धतीने करण्यात आली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर, भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित चित्र गॅलरी तयार करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.