फॅशन-भक्तीचा अनोखा मिलाफ; अयोध्येतील राम मंदिराच्या डिझाईनच्या खास साडी दुकानात उपलब्ध - पानेरी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-01-2024/640-480-20517583-thumbnail-16x9-ram-mandir-design-saree.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jan 17, 2024, 6:48 AM IST
मुंबई Ram Mandir Design Saree : अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त केवळ अयोध्या नगरीतच नव्हे, तर देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्या नगरीमध्ये 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून या अभूतपूर्व सोहळ्यास देशभरातून लाखो रामभक्त उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबईत आगळावेगळ्या पद्धतीनं भगव्या साडीवर अयोध्येतील भव्य श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती रेखाटण्यात आली आहे. तसंच या साडीवर 'जय श्रीराम' असंही लिहिण्यात आलंय. त्यामुळं ही विशेष साडी बघण्यासाठी आणि ही साडी खरेदी करण्यासाठी दादर तेथील 'पानेरी' या साड्यांच्या दुकानात ग्राहक गर्दी करत आहेत.