मुलावर आणि पत्नीवर गुन्हा दाखल हे दुर्दैवी; मला अटक होऊ शकते -राजन साळवी - Uddhav Thackerays Call to Salvi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-01-2024/640-480-20538366-thumbnail-16x9-rajan-salvi.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jan 18, 2024, 4:49 PM IST
|Updated : Jan 18, 2024, 5:00 PM IST
रत्नागिरी Rajan Salvi Reaction : आज सकाळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आमदार साळवींच्या रत्नागिरीतील घराची झडती घेतली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा (Acbs Action) दाखल केला आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आमदार राजन साळवी यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची गर्दी केलीय.
मी अटकेला घाबरत नाही : एसीबीच्या या कारवाईनंतर आमदार राजन साळवी यांना उद्धव ठाकरे यांनी फोन केला आहे. फोनवरून उद्धव ठाकरे यांनी साळवी यांना धीर दिला. दरम्यान साळवी यांनी म्हटलं की, माझ्या मुलावर आणि पत्नीवर देखील गुन्हा दाखल झाला हे दुर्दैवी आहे, मला अटक होऊ शकते पण मी अटकेला घाबरत नाही असं साळवी यांनी म्हटलंय.