Raj Thackeray News: रस्ते करताना सरकारला भीती वाटेल असे आंदोलन करा - राज ठाकरे - Raj Thackeray On Mumbai Goa Highway

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 16, 2023, 5:46 PM IST

नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. पनवेल येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपासह महाविकास आघाडीवर देखील हल्ला चढवला. तसेच कोकणात उद्योग जरूर यावेत, मात्र कोकणचं सौंदर्य राखूनच कोकणात उद्योग यावेत. जर परप्रांतीय लोक कोकणात आले तर कोकणाचं रुपडं घाण करतील असे वक्तव्य पनवेल येथील सभेत राज ठाकरे यांनी केले. समृद्धी महामार्ग जर चार वर्षात होत असेल तर कोकणातील आमदार, खासदार काय करतात? तात्काळ पावले उचलून शासनाने मुंबई गोवा महामार्गाचे उत्तम काम करावे. त्याचबरोबर मनसैनिकांनी रस्ते करताना सरकारला भीती वाटेल असे आंदोलन करा असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी आपल्या ठाकरी शैलीत सर्वांचा समाचार घेतला. त्याचबरोबर शिवडी न्हावा शेवा ब्रिज झाल्यानंतर रायगडमधील शेतकऱ्यांची अवस्था बिकट होणार, त्यामुळे सांभाळून राहा, असा सल्ला देखील ठाकरेंनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.