हवामान बदलाचा फटका; ऐन थंडीच्या कडाक्यात सातारा जिल्ह्यात पावसाच्या सरी, पाहा व्हिडिओ - हवामान बदलाचा फटका
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/05-01-2024/640-480-20432810-thumbnail-16x9-rainsatara.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jan 5, 2024, 7:02 AM IST
सातारा Rain In Satara District : ऐन हिवाळ्याच्या दिवसात हवामानात बदल झाला. काल गुरवारी (४ जानेवारी) सातारा जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आणि त्यानंतर रात्री कराड तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झालाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारं वाहत असल्यामुळं हा पाऊस झाल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. साताऱ्यातील कराड तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली. कराड शहर आणि तालुक्यात झालेल्या पावसामुळं तासभर वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु, या पावसामुळे हवामान बदलाचा आणि पावसाचा एकाचवेळी पिकांना मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी फळबागांचे उत्पादन काढण्यासाठी आलेले असताना, या पावसामुळे पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलीये.