Tanker Catches Fire: तेलाच्या टँकरला लागली अचानक आग, पाहा व्हिडिओ - रायगडमध्ये टँकरला आग

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 30, 2023, 10:13 AM IST

रायगड : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाजवळ शनिवारी रात्री उशिरा धावत्या टँकरला आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. दोन्ही बाजूंनी एक किलोमीटरपर्यंतची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली. आगीची माहिती मिळताच रस्त्याच्या दुतर्फा येणारी वाहने घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर थांबवण्यात आली. रायगड पोलिसांनी सांगितले की, 29 जुलै रोजी रात्री उशिरा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाजवळ चालत्या तेलाच्या टँकरला आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग आटोक्यात आली आहे.  महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीच्या दुर्घटनेतून तेल टँकरचा चालक बचावला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला. तेल टँकरच्या मालकाची माहिती घेण्यात येत आहे. या टँकरला आवश्यक परवानग्या आहेत की नाही, याबाबत रायगड पोलीस तपास करत आहेत. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.