पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू - Pune Mumbai Expressway news
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 19, 2024, 10:22 AM IST
पुणे : पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आज (19 जानेवारी) रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. खोपोली हद्दीत पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या आयशर टेम्पोने अज्ञात वाहनाला धडक दिल्यानं टेम्पोतील चालकासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अनिल गावित आणि अनिकेत बोरसा असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. आयशर टेम्पो चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलय. अपघातातील अज्ञात वाहन चालक हा अपघाताची माहिती न देता पळून गेला. घटनेची माहिती मिळताच खोपोली येथील दस्तुरी बोरघाट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही मृतदेह शविच्छेदनासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळं पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक खंडाळा घाटात काही काळ विस्कळित झाली होती. या घटनेनंतर आयशर टेम्पो क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तर, पुढील तपास खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत करत आहेत.