पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून भोंदू बाबानं पळविले १८ लाख रुपये, पाहा कसा घातला तरुणाला गंडा - पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 4, 2023, 11:15 AM IST
|Updated : Dec 4, 2023, 2:22 PM IST
पुणे Pune Crime News : सुसंस्कृत पुरोगामी असलेल्या पुण्यनगरीमध्ये जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पैशाचा पाऊस पडतो म्हणून एका भोंदू बाबानं तरुणाचे 18 लाख रुपये पळवल्याची घटना घडलीय. पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात 3 ऑक्टोबरला पैशाचा पाऊस पडण्याची भूलथाप देण्यात आली होती. याबाबत विनोद छोटेलाल परदेशी यांनी 2 डिसेंबरला हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाबा आईरा शॉब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पांडगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार विनोद छोटेलाल परदेशी यांना त्यांच्या मित्रमार्फत पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून बाबानं एक अघोरी पूजा मांडायला सांगितली. 3 ऑक्टोबरला पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही बनावट पोलीस आले. त्यांनी बाबासाह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पसार झाले. या प्रकरणी आता या भोंदू बाबासह तिघांचा शोध हडपसर पोलीस घेत आहेत.