Pt Ajoy Chakrabarty : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत महाराष्ट्रामुळेच जिवंत - पं. अजॉय चक्रबर्ती - संगीत व राग यांचा विचार होतो

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 17, 2022, 6:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

पुणे पूर्वी शास्त्रीय संगीताचे चाहते व जाणकार हे केवळ बंगालमध्येच राहिले आहेत असे म्हटले जायचे. मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संगीत, राग यांचा विचार होतो आणि म्हणूनच अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत हे महाराष्ट्रामुळेच जिवंत आहे, असे गौरवोद्गार praised Maharashtra and Classical music पद्मभूषण पं. अजॉय चक्रबर्ती यांनी Pt Ajoy Chakraborty काढले. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या व्यासपीठावरून 68th Sawai Gandharva Bhimsen Festival आपली कला सादर करण्यापूर्वी पं. चक्रबर्ती यांनी शुक्रवारी उपस्थितांशी संवाद साधला. 'पुण्यामध्ये देशविदेशातील कलाकार येऊन आपली कला सादर करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रसिक संगीतावर भरभरून प्रेम करतात. नागरिकांमध्ये शास्त्रीय संगीताबद्दल आदर व प्रेम आहे. त्यामुळेच आज शास्त्रीय संगीत जिवंत असून, ते योग्य प्रकारे व श्रद्धेने नव्या पिढीपर्यंत नेण्याची गरज आहे. यासाठी मी देखील प्रयत्नशील असून, गेली २० वर्षे मी मुंबईमध्ये यासंदर्भात संशोधन करत आहे', असे देखील पं. अजॉय चक्रबर्ती यावेळी म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.