Protest in Kolhapur सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, कोल्हापूर सांगली मार्गावर आंदोलन - declaration of wet drought
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर राज्यात परतीच्या पावसाने ( Return monsoon in maharastra ) प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन ( Protest in Kolhapur ) करण्यात आले. कोल्हापुरातील सांगली फाटा या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापूर - सांगली मार्ग अडवून हे आंदोलन केले गेले. शिवसेना नेते अरुण दुधवाडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले. परतीच्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसैनिकांची आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे, शेतमजुरांना प्रति दिन 300 रुपये द्यावे, अशी मागणी शिवसैनिकांची आहे. दरम्यान, यावेळी काही काळानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST