Protest On Road : पंढरपूर गुहागर महामार्गावरील खड्ड्यांमध्ये भाताची रोपे लावून आंदोलन, पहा व्हिडिओ - watch video
🎬 Watch Now: Feature Video
सातारा : पावसामुळे महामार्ग आणि राज्य मार्गांची चाळण झाली आहे. यामुळे अपघात वाढले असून वाहनांचे पण नुकसान होत आहे. तरीही रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे पाटण तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मंगळवारी पंढरपूर गुहागर महामार्गावरील खड्ड्यांमध्ये भाताची रोपे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. तसेच कराड -चिपळूण रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध करून तासभर वाहतूक रोखून धरली होती. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पाटण तालुका अध्यक्षा स्नेहल जाधव, बबनराव कांबळे, सत्यजित शेलार, बाळासाहेब कदम, संपत जाधव, पंकज गुरव, सुरज पंधारे, अश्फाक शेख, कोयना विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास येत्या १५ दिवसांत तीव्र आंदोलन करून कराड चिपळूण रस्त्याची वाहतूक बंद पाडू, असा इशाराही आंदोलकांनी दिला.(Protest On Road )