Ram Navami Shirdi : प्रभु रामचंद्राची प्रतिमा सोन्याच्या रथात; शिर्डीतून निघाली शोभायात्रा - Shriram Procession In Shirdi
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर: 'रामजी की निकली सवारी..रामजी की लिला है न्यारी' अशा सुरात आज सायंकाळी प्रभु रामचंद्राची प्रतिमा सोन्याच्या रथात विधीवत पूजन करून ठेवण्यात आली. त्यासोबत साईबाबांची प्रतिमा, बाबांच्या चरण पादुका आणि सटका ठेवून सुवर्ण रथात मिरवणूक काढण्यात आली. रथासमोर ढोल ताशांचा निनाद आणि मागे प्रभू रामचंद्राचा रथ इस विलोभनीय दृष्य पाहण्यासाठी भाविकांची एकच गर्दी उसळली. रथात विराजमान प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन भाविक नतमस्तक होत होते.
भक्तांचा अलोट गर्दी: रामनवमी निमित्ताने आज सायंकाळी 5 वाजता साई मंदिरापासून प्रभु रामचंद्राची शोभा मिरवणूक निघाली. द्वारकामाईत विधीवत पूजन होऊन प्रभू रामचंद्राची प्रतिमा, साईंची प्रतिमा, चरण पादुका आणि सटक्याची सुवर्णरथातून शिर्डीतून मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या निनादात दोन तास ही शोभा मिरवणुक सुरू होती. भाविक ही दर्शनासाठी गर्दी करत होते. सात वाजता रथाची मिरवणूक साई समाधी मंदिरात पोहचल्यानंतर साईंची धुपारती पार पडली.
मंदिर रात्रभर उघडे: हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या भगव्या आणि हिरवा झेंडा असलेली काठ्यांची निशान मिरवणुकही मोठ्या दिमाखात निघाली. सर्वच धर्मांचे भाविक यात सामिल झाले होते. उंच उंच घेऊन आकाशी झेप घेणारे हे निशान जणू सर्वधर्म समभावाची शिकवण देत होते. शिर्डीतील हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी सातत्याने वाढतच होती. आज मुख्य दिवस असल्याने जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी साई समाधी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले आहे. आजची शेजारती आणि पहाटची काकड आरती होणार नाही.
हेही वाचा: Violence in Howrah: पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार, अनेक वाहने पेटवली