Bus Accident Pune : मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात; १२ प्रवासी जखमी - सिम्बायोसिस हॉस्पिटल लव्हाळे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 19, 2023, 10:16 AM IST

पुणे : पुण्यातील चांदणी चौक परिसरात  खासगी बसचा अपघात झाला असून या अपघातात १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना चेल्लाराम हॉस्पिटल बावधन, सिम्बायोसिस हॉस्पिटल लव्हाळे, तसेच ससून हॉस्पिटल या तीन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याच्यी माहिती मिळते आहे.  

12 प्रवासी किरकोळ जखमी : खासगी बस बंगळुरूहून बाईकडे जात असताना चांदणी चौकातील बावधन सीएनजी पेट्रोल पंपासमोर महामार्गावरून बस सर्व्हिस रोडवर पलटी झाली. या बसमध्ये 36 प्रवासी होते तर, 12 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना पुण्यातील चेल्लाराम हॉस्पिटल बावधन, सिम्बायोसिस हॉस्पिटल लव्हाळे, ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबईहून पुण्यामार्गे बंगळुरूला जाणारी खासगी बस चांदणी चौक परिसरात रस्त्यावरून घसरून अपघात झाला. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस शर्मा ट्रॅव्हल्सची होती. बावधन येथील मुख्य रस्त्यावरून सर्व्हिस रोडवर जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 15 ते 20 फूट खाली पडली. या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बस बायपासपासून सुमारे 15 फूट खाली पडून उलटली. अपघातग्रस्त बसमध्ये 35 प्रवासी होते. बस रस्त्यावरून घसरल्याने आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कोथरूड परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.