Prithviraj Chavan On Lathicharge : आंदोलन दडपण्याचा आदेश मुंबईतूनच - पृथ्वीराज चव्हाण - शिवेंद्रराजे भोसले
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 2, 2023, 5:15 PM IST
सातारा Prithviraj Chavan On Lathicharge : जालन्यातील मराठा आरक्षणाचं आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याची माहिती मिळत आहे, असा खळबळजनक आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. या निंदनीय घटनेची जबाबदारी ही गृहमंत्र्यांची आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारनं स्पष्ट करावं, अशी मागणीही त्यांनी केलीय. अमानुष लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून पोलिसांचं हे कृत्य अतिशय निंदनीय आहे. शासनाने या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उदयनराजेंनीही केलीय. या लाठीहल्ल्याची चौकशी झाली पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या घटनेची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करतील, असा विश्वास आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलाय.