विनायक राऊत यांनी उबाठाचा खांबाटा केला, उबाठा ओस पडायची वेळ आली - भाजपा नेते प्रमोद जठार - प्रमोद जठार यांची विनायक राऊत यांच्यावर टीका

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 7:23 PM IST

रत्नागिरी Pramod Jathar Criticizes Vinayak Raut : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर देवरुख येथे टीका केली. (Former BJP MLA Pramod Jathar) विनायक राऊत यांनी उबाठाचा खांबाटा केला. आता उबाठा ओस पडायची वेळ आलेली आहे. मुंबईतील खांबाटा इव्हिएशन कंपनी खासदार विनायक राऊत यांच्यामुळे बंद पडली, असेही ते म्हणाले. (MP Vinayak Raut)

राऊतांकडून प्रकल्पांची अडवणूक : विनायक राऊत यांनी खांबाटा बंद करून अनेक पोरं देशोधडीला लावली. अशा स्थितीत आता कोकणचा खांबाटा होणार नाही याची काळजी जनतेने करायची आहे. त्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी जनतेच्या दरबारात आम्ही जात आहोत. (Khambata Aviation Company) जनतेलाही आता बदल हवा आहे. यावेळेला इथल्या लोकसभेच्या खासदाराची भाकरी जनता परतवणार आहे. याउलट या ठिकाणी महायुतीचा खासदार निवडून येणार. विनायक राऊतांनी प्रकल्पांची अडवणूक केल्यानं इथं बेरोजगारी वाढली. याचा फटका युवकांना सोसावा लागला, असं निरीक्षणही भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी नोंदविले.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.