Prakash Ambedkar : मराठा आरक्षणावर सरकार प्रामाणिक नाही; जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष- ॲड. प्रकाश आंबेडकर - मराठा आरक्षणावर प्रकाश आंबेडकर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 19, 2023, 8:46 PM IST
पुणे : Prakash Ambedkar On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करत असून, ते मुंबईमध्ये अनेकांच्या भेटीगाठी आणि बैठकासुद्धा घेत आहेत. परंतु, मराठा आरक्षणावर सरकार प्रामाणिक नाही. सरकारची आरक्षण देण्याची इच्छा नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे आमचे लक्ष असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पुण्यात दिलेली आहे.
'वंचित'शी होणारी युती बिनसली : संभाजीराजे छत्रपती आणि 'वंचित'ची युती होणार, यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. पुढे आंबेडकरांनी औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेतल्याने ते नाराज झाले. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, त्यांनी त्यांच्या पायावर दगड मारून घ्यायचे ठरवले आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो, आम्हाला त्यांची गरज नव्हती आणि त्यांनी मराठा आरक्षणावरसुद्धा आता समाजाला सांगावं की आरक्षण मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.
भीमा कोरेगाव आयोगासमोर आंबेडकरांची हजेरी : पुण्यात भीमा कोरेगाव आयोगासमोर गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली होती. ललित पाटील ड्रग्स प्रकरणात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, पोरबंदरमध्ये 20 हजार कोटीचे ड्रग्ज पकडले. त्याचा तपास कुठे, कसा सुरू आहे हे माहिती नाही. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना सायकलमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यातील सायकलवाला गायब आहे तसे हे सुरू आहे. पोलीस खात्याविषयी जरांगे पाटील यांनी बोलावं. जोपर्यंत ते सांगत नाही तोवर आपण बोलून उपयोग नाही.