प्रभू श्रीरामचंद्रानं केंद्र, राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी; मनोज जरांगे पाटलांचं साकडं - मराठा आरक्षणाचा मुद्दा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 1, 2024, 6:43 PM IST
बीड Maratha Reservation Issue : प्रभू श्रीरामानं अन्यायाविरोधात लढा उभारला होता. आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालाय. आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू श्रीरामचंद्रानं केंद्र आणि राज्य सरकारला द्यावी, यासह मराठा आरक्षण जाहीर करावं, असं साकडं प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी घातलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे बीडमध्ये त्यांचे सहकारी ऋषिकेश बेद्रे यांच्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आले होते. (Central Government) यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हाच माझा आजच्या नवीन वर्षाचा संकल्प असेल, मराठा समाजाच्या अनेक पिढ्या आरक्षणाअभावी बरबाद झाल्या आहेत. आता भावी पिढीसाठी प्रत्येकानं घराबाहेर पडायचं आहे. असं आवाहन करत आरक्षणाची ही लढाई निर्णायक असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं.
आधीप्रमाणं आरक्षण द्यावं : मनोज जरांगे पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेलं वक्तव्य हे सुप्रीम कोर्टातील आरक्षणाबाबत असेल, आता आरक्षणाबाबत पुरावे देखील सापडले आहेत. त्याप्रमाणं आम्हाला आरक्षण द्यावं. अशी आमची मागणी असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.