Refinery Protest Ratnagiri: रिफायनरी आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात; आंदोलन चिघळण्याची शक्यता - रिफायनरी प्रकल्पाला नाणार ग्रामस्थांकडून विरोध
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या दृष्टीने या परिसरामध्ये माती परिक्षणाच्या सर्व्हेक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माती परिक्षणासाठी ड्रिलींगचे काम सुरू होण्याच्या शक्यतेने या परिसरातील लोकांनी कालपासून सड्यावर धाव घेतली आहे. सड्यावर मोठ्यासंख्येने असलेल्या ग्रामस्थांनी जोपर्यंत रिफायनरी रद्द झाली पाहीजे, अशी आग्रही मागणी करीत तो रद्द होईपर्यंत आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. दरम्यान आज काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण ग्रामस्थांचा विरोध ठाम आहे. रिफायनरी प्रकल्पाला नाणार ग्रामस्थांकडून विरोध केला गेल्यानंतर आता शासनाकडून बारसू-सोलगाव परिसरामध्ये त्याची उभारणी करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये बारसू-सोलगाव परिसरामध्ये माती परिक्षणासाठी ड्रिलींगचे काम सुरू होणार आहे. प्रत्यक्षात माती परिक्षणासाठी ड्रिलींगचे काम कधी सुरू होणार? याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध होत नाही. मात्र, दुसर्या बाजूला हे काम रोखण्यासह रिफायनरी रद्दच्या मागणीसाठी मोठ्यासंख्येने महिला-पुरूषांसह तरूणांनी बारसू परिसराच्या सड्यावर ठिय्या मांडला आहे. दरम्यान आज आंदोलकांनी रस्त्यावर झोपून मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.